प्रतिक्षा आता खा. विखे- कर्डिलेंच्या गौप्यस्फोटाची? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

प्रतिक्षा आता खा. विखे- कर्डिलेंच्या गौप्यस्फोटाची?

 प्रतिक्षा आता खा. विखे- कर्डिलेंच्या गौप्यस्फोटाची?

जिल्हा सहकारी बँकेचे चित्र स्पष्ट

पडद्याआडून काय झाल्या हालचाली? कोण कोणाचा? नात्यागोत्यांच्या चक्रव्यूहात नवी समीकरणे जिल्हा सहकारी बँकेच्या 4 जागांचा निकाल लागला. बिनविरोधसाठी व 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी पडद्याआड बर्‍याच हालचाली झाल्या. भाजपा व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पडद्याआड ज्या बैठका झाल्या त्यात नेमके काय ठरले व प्रत्यक्षात काय घडले याचा गौप्यस्फोट करणार म्हणून खा. सुजय विखेही बोलले व माजी आ. शिवाजीराव कर्डिलेही बोलले आहेत. हे दोन्ही नेते काय गौप्यस्फोट करतील यावरच जिल्ह्यातील आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. प्रतिक्षा आता खा. विखे-कर्डिलेंच्या गौप्यस्फोटाची ?




नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा सहकारी बँक निवडणुकीतील 4 जागांचा निकाल लागल्यावर आता चर्चा सुरू आहे बँकेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार काँग्रेस की राष्ट्रवादीकडे, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी या निवडणुकीची सूत्रे हातात घेतल्यामुळे राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या त्याखालोखाल भाजपला 7, काँग्रेसला 4 व शिवसेनेला 1 जागा मिळाली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची या अध्यक्षपदासाठी महत्त्वाची भूमिका असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनात काय आहे, याचाही विचार थोरातांना करावा लागणार आहे.

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीतील 4 जागांचा निकाल काल लागला. अपेक्षेप्रमाणे 2 जागा महाविकास आघाडी व 2 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण कर्जत मधील अंबादास पिसाळ यांचा विजय अनपेक्षित मानला जात होता. आ. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मीना साळुंखे यांचे मागे मोठी ताकत लावून नही त्यांना 1 मताने पराभव स्वीकारावा लागला. आ. पवारांच्या वर्चस्वाला हा धक्का मानला जात आहे.
भाजपा व महाविकासआघाडी असा सामना जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत होईल अशी अपेक्षा असताना जिल्ह्यात सहमती एक्सप्रेस वेगाने धावली. मातब्बर असे विळ्या भोपळ्याचे नाते असणारे मातब्बर नेते या एक्सप्रेस मध्ये बसले. पण जिल्ह्याचे कोणत्याही पक्षाच्या सहीतेत बसणारे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सहमती एक्सप्रेस मध्ये प्रवेश मिळाला नाही. तो कोणी रोखला हा संशोधनाचा विषय आहे. पूर्वी ते राष्ट्रवादीत होते. आज भाजपात आहेत. त्यांचेवर राग नेमका कोणाचा आहे. भाजपाचा का राष्ट्रवादीचा हे समजायला मार्ग नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजपा 7, काँग्रेसच 4, शिवसेना 1, असे बलाबल सध्या दिसत असले तरी बँकेच्या राजकारणात दोनच पक्ष आहेत. ते म्हणजे बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे ही निवडणूकही या दोन्ही नेत्यांनीभोवतीच फिरत राहिली आहे. बँके चाअध्यक्ष महाविकास आघाडीचा होणार यात शंका नाही पण तो राष्ट्रवादीचा असेल की काँग्रेसचा हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेना जिल्हा बँकेच्या राजकारणात पहिल्यांदाच आली. असे असले, तरी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक नंतर राष्ट्रवादीत आलेले सबाजी गायकवाड पूर्वी जिल्हा बँकेचे संचालक होते. अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ हे दोघेच विखे गटाचे जिल्हा बँकेत प्रतिनिधी आहेत. पिसाळ यांचा तर अवघ्या एका मताने विजय झाला. थोरात-पवार यांनी ताकद लावली असती, तर कदाचित तीही जागा जिंकता आली असती. खासदार डॉ. सुजय विखे यांनी रामदास भोसले आणि दत्ता पानसरे यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली; परंतु भोसले यांना मिळालेली अवघी सहा मते आणि पानसरे यांचा मोठ्या मताधिक्याने झालेला पराभव बदलत्या राजकीय समीकरणाची चाहूल आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विखे यांचे वर्षानुवर्षाचे समर्थक असलेले नंदकुमार झावरे यांनी विखे यांच्याविरोधात पवित्रा घेऊन नीलेश लंके यांना मदत केली. आता त्याच लंके आणि झावरे यांनी एकत्र येऊन उदय शेळके आणि प्रशांत गायकवाड यांच्या विजयाच्या पालख्या उचलल्या. विवेक कोल्हे, मोनिका राजळे, अमोल राळेभात यांच्यासह अन्य तीन जण भाजपचे असले, तरी त्यांनी भाजपेपक्षा थोरात-पवारांशी जुळवून घेतल्याने त्यांचा बँकेत चंचुप्रवेश झाला. शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात नगर-राहुरी तालुक्यातील राजकारणाचेे संदर्भ वेगवेगळे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही कर्डिले यांना विरोध असतो. कर्डिले विरोधावर त्यांचे राजकारण चालू असते. त्यामुळे थोरात-पवार यांनी प्रयत्न करूनही कर्डिले यांना बिनविरोध निवडून आणता आले नाही. अर्थात विधानसभेच्या निवडणुकीत विखे यांनी कर्डिले यांच्याबाबत काय केले, हे कर्डिले यांनीच जाहीर तक्रार करून सांगितले आहे.

“चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही महाराष्ट्रातील आदर्श बँक आहे. असून या बँकेची निवडणूक राजकारण विरहित केलेली आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पध्दत आहे. ही शिस्त आमच्याकडे असून ती आम्हाला टिकवायची आहे. त्यात राजकारण असा गुंता आम्ही करत नाही. - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

No comments:

Post a Comment