साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्य अनुकरणीय ः शीतल जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्य अनुकरणीय ः शीतल जगताप

 साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्य अनुकरणीय ः शीतल जगताप

वसंत टेकडीच्या साई मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः वसंतटेकडी येथील श्रीराम चौकातील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरात श्री.साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या महिलाच्या वतीने हळदीकुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका शीतल जगताप यांच्यासह नगरसेवक सुनील त्र्यबंके,सीमा त्र्यबंके,रुपाली वारे,संध्या पवार,प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, बाळासाहेब पवार,निखिल वारे,बबलू सूर्यवंशी,पूजा गडकरी,कांता बोठे,कांचन बिडवे,अनुजा कांबळे,वनिता बिडवे,पुष्पा राऊत,सौ कुडिया,सौ गायकवाड,सौ बनकर आदी सह मोठ्या संख्येनेआदीसह मोठ्या संख्येने परिसरातील महिला वर्ग उपस्थित होते.
जगताप यावेळी बोलताना म्हणाल्या हळदी कुंकू कार्यक्रमच्या निम्मिताने महिला एकत्र येतात हि आपली परंपरा कायम पुढे चालू राहील सध्याच्या कोविडच्या काळात साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने खुप चांगले काम केले यामध्ये महिला मंडळ पण पुढे होते , महिला मंडळाने पुढील काळात महिला साठी उद्योग त्याचे सबलीकरण , आरोग्य विषयक उपक्रम राबवावे नगरसेवक त्र्यंबके व त्याचे प्रतिष्ठान नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात, गोरगरीब व सर्व धर्मासाठी त्याचे कार्य चालू असते त्यांनी या ठिकाणी शासकीय नियम पळून  सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करावे त्यामुळे गोरगरिब लोकांनां फायदा होईल.यावेळी प्रतिष्ठानच्या महिलानी कार्यकर्त्यानी उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वाण दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here