मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहते- उद्धव कांंबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहते- उद्धव कांंबळे

 मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहते- उद्धव कांंबळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे क्रिकेट मॅचेसच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दशमिगव्हण परिसरातील गावांमधील तरुणांसह नगर तालुक्यातील अनेक तरुण या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला
 क्रिकेट स्पर्धेसाठी 31 हजार रुपये प्रथम बक्षीस ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडूंसाठी विविध बक्षिसांच्या आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच उद्धव कांबळे म्हणाले की खेळामुळे आरोग्य उत्तम राहते त्याचबरोबर शरीराचा व्यायाम होतो .तरुणांनी मोबाईल मध्ये जास्त वेळ न घालवता मैदानी खेळांनकडे वळावे त्याचबरोबर पालकांनीही मुलांना लहान वयात मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून मैदानी खेळामुळे बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते असे मत व्यक्त केले यावेळी दशमिगव्हण क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here