स्थायीच्या सदस्यांचं ठरलं आता उत्सुकता नविन सभापतीची - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

स्थायीच्या सदस्यांचं ठरलं आता उत्सुकता नविन सभापतीची

 स्थायीच्या सदस्यांचं ठरलं आता उत्सुकता नविन सभापतीची





नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी आज महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली असून यामध्ये स्थायीच्या नवीन सदस्य पदी शिवसेनेकडून रिता भाकरे, सचिन शिंदे, परशराम गायकवाड, राष्ट्रवादीकडून अविनाश घुले व समद खान बसपाकडून मुदस्सर शेख व भाजपाकडून रविंद्र बारस्कर वंदना ताठे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला.

स्थायी समितीत नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पक्षाच्या गट नेत्यांकडून नव्या सदस्यांची नावे बंद पाकीटात महापौरांकडे देण्यात आली.
शिवसेनेकडून रिता भाकरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड यांची नावे गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी महापौरांकडे सुपूर्द केली. बसपा कडून बसपाचे गटनेते मुदस्सर शेख यांनी स्वतःचेच नाव महापौरांकडे सुपूर्द केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांनी अविनाश घुले व समद खान यांचे नाव महापौरांकडे सुपूर्द केली असून भाजपाकडून गटनेत्या मालन ताई ढोणे यांनी रविंद्र बारस्कर व वंदना ताठे यांची नावे महापौरांकडे सुपूर्द केली नवनिर्वाचित सदस्यांचे महापौर वाकळे यांनी शुभेच्छा देऊन सभेची सांगता झाली. आता सर्वांचे लक्ष नवीन सभापती कोण होणार याकडे लागले आहे.

No comments:

Post a Comment