रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानात युवकांनी पुढाकार घ्यावा ः म्हस्के - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानात युवकांनी पुढाकार घ्यावा ः म्हस्के

 रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानात युवकांनी पुढाकार घ्यावा ः म्हस्के

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संकटकाळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात आरपीआयच्या युवा कार्यकर्त्यांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. शहरात आरपीआयचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. त्याचा एक भाग म्हणून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, उपनगर उपाध्यक्ष जावेद सय्यद, युवक तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, संतोष पाडळे, शहर संघटक बंटी बागवान, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे, मेहर कांबळे, दिनेश पाडळे, ऋषिकेश विधाते, शिवम साठे, सुशिल म्हस्के, भिम वाघचौरे, राकेश चक्रनारायण, मयूर बाबनी, सोनू भंडारी, सोनू काळे,  विनोद पाडळे, विशाल व्यवहारे, उमेश गायकवाड, गणेश कासार, अक्षय बाबनी, मंजूर शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. रक्ताला जात, धर्म नसते. रक्तही मानवी जीवनाला मिळालेली अमूल्य देणगी असून, रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नाही. रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची आहे. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर रक्तही मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक बाब बनली असून, गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रक्तदात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here