भुयारी गटार योजना, कामे नित्कृष्ट! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

भुयारी गटार योजना, कामे नित्कृष्ट!

 भुयारी गटार योजना, कामे नित्कृष्ट!

भुयारीगटार योजनेचा 124 कोटी रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा मनसेचा आरोप

पिण्याचे पाणी, प्रमुख रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे, भुयारी गटार योजना.. या तीनही बाबी शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असताना या तीनही प्रमुख प्रश्नांकडे महानगरपालिकेचे सतत दुर्लक्षच झालेले आहे.
सध्या शहरात भुयारी गटार योजनेचे काम शहरात सुरू आहे. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून नगर जिल्हा मनसेने या प्रश्नात लक्ष घालून भुयारी गटार योजनेच्या कामांची पाहणी करून या कामांची 10 दिवसांच्या आत चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदारांच्या भुयारी गटार योजनेच्या कामांची पाहणी करूनच बिले अदा करण्यात यावी. अन्यथा मनसे या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभारेल असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरात सध्या भुयारी गतर योजनेचे कामे सुरू असून ते कामे नित्कृष्ट दर्ज्याची होत असल्याचे मनसेचे नितीन भुतारे यांना समजताच मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगर पुणे हायवेवर काम सुरू असलेल्या ठिकाणी. भेट दिली असता त्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम नित्कृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे दिसुन आले.

नगर पुणे हायवेवर जड वाहतूक सुरू असते त्या मध्ये जे चेंबर या महामार्गावर बांधले जात आहे. ते बांधायच्या आधी खाली खडी काँक्रीटीकरण करणे गरजेचे असताना देखील त्या चेंबर खाली काँक्रीटीकरण करतांना दिसुन आले नाही. तसेच काँक्रीटीकरण न करताच चेंबर बांधले जात असल्याचे दिसून आले. तसेच चेंबर चा वर साईड ने सुध्दा खडी काँक्रीटीकरण गरजेचे आहे परंतु वरती सुध्दा साईडला खडी काँक्रीटीकरण दिसुन आले नसून चेंबर खाली व वर साईडला फक्तत माती टाकल्याचे व कच मध्ये सिमेंट कालवुन टाकल्याचे व साईडला लावल्याचे दिसुन आले. अश्याच प्रकारे संपूर्ण शहरात अशी नित्कृष्ट दर्जाची कामे सादर ठेकेदाराने केलेली असल्यामुळे जड वाहतूक सोडाच परंतु छोट्या दुचाकी गाड्या जरी त्यावरून गेल्यातरी हे चेंबर खचून जातील व पावसाळ्यात पुन्हा या बोगस कामामुळे पाणी तुंबन्याचे प्रमाण वाढेल व पुन्हा अश्या कामांसाठी निधी शहराला पुन्हा मिळवण्यासाठी 20 वर्ष वाट पाहावी लागेल.
मनसे पदाधिकारी  यांनी पाहणी करून ज्या भागात भुयारी गटार योजनेच्या कामांचा लाईन खोदाई चालू आहे. त्या खोदलेल्या लाईन मध्ये मुरूम भराव करणे गरजेचे असताना त्या मध्ये खोदलेली मातीच पुन्हा टाकली जात असल्याचे दिसून आल्यामुळे या खोदाई केलेल्या कामांच्या ठिकाणी नवीन रोड केल्यावर ते खचल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, तसेच उपाशहराध्यक्ष्य गणेश शिंदे यांनी महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देऊन संपुर्ण कामांची 10 दिवसांच्या आत चौकशी करण्याची मागणी केली असून लवकरात लवकर संबधित ठेकेदाराला सर्व भुयारी गटार योजनेच्या कामांची पाहणी केल्यानंतरच बिले अदा करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना   मोठे जनआंदोलन उभारेल याची नोंद घ्यावी असा ईशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here