श्री विशाल गणेश मंदिरात गणेशजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 15, 2021

श्री विशाल गणेश मंदिरात गणेशजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

 श्री विशाल गणेश मंदिरात गणेशजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे विविध धार्मिक कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी श्री गणेश जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम व सौ.सोनाली कदम यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्योजक दिनेश आगरवाल, पराग नवलकर, पुजारी संगमनाथ महाराज, मयुर महाराज, आदिंसह विश्वस्त उपस्थित होते.
जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी अथर्वशिष्य, मंत्रोच्चरात पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानाच्यावतीने भाविकांची दर्शनाची मंडप व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, हरिश्चंद्र गिरमे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here