श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी

 श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी

श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने महाप्रसाद वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचे 4000 भाविकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने पद्मशाली समाजातील प्रसिद्ध असलेले पप्पु-बुव्वा मिष्ठान्न भोजन करण्यात आले. यामध्ये भात, वरण, पुरी, गुलाबजाम असे पदार्थ ठेवण्यात आले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त देवस्थानच्यावतीने सकाळ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता ऋद्राभिषेक, स.8 वा.होमहवन, सकाळी 10 वा.सत्यनारायण महापुजा, स.11 वा.आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप रामदास वेल्डींग वर्कचे संचालक रामदास सुंकी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 10 वर्षापासून मार्कंडेय जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच वर्षभरात विविध सामाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, वृक्षरोपण कार्यक्रम, महाआरती उपक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात येतात, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.शुभम सुंकी यांनी सांगितले.
जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे सर्व पदाधिकारी व प्रतिष्ठानचे अमित गाली, योगेश न्यालपेल्ली, किशोर शिंदे, अजय लयचेट्टी, अमित सुंकी, आकाश आरकल, विशाल जव्हेरी, प्रविण सुंकी, राजू म्याना, सुमित गाली, रितेश गाली, गणेश अवधुत, राहुल म्याना आदींनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here