गावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

गावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर

 गावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षण क्षेत्रात आदराने उल्लेख केला जातो. ज्या महाविद्यालयात दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत. अशा महाविद्यालयात गागावातून विषारद निर्माण करण्याची क्षमता आहे. अशा महाविद्यालयाशी अखिल भारतिय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्यशी सहकार्य करार करताना आनंद होत असल्याचे मत अखिल भारतिय गंधर्व महा विद्यालयल, मंडळ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांनी व्यक्त केले.
न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर चा संगीतविभाग आणि अखिल भारतिय गंधर्व महाविद्यालय मुंबई यांच्यात महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सहकार्य करार समारोह संपन्न झाला. यावेळी संगीत मैफिल आयोजित करण्यात आली. याप्रसंगी डॉ.कशाळकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव विश्वाससराव आठरे, विस्वस्त वसंतराव कापरे, प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, संगित विभागाचे प्रमुख निलेश खळीकर तर गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.विकास कशाळकर, उपाध्यक्ष पांडूरंग मुखडे, गांधर्व महाविद्यासयाचे निबंधक विश्वाससराव जाधव उपस्थित होते.या वेळी न्यू आर्टस महाविद्यालयाच्या संगित विभागाने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवात विभाग प्रमुख निलेश खळीकर व विद्यार्थांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनास नगर शहरातील संगीत रसिक व विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांनी प्रास्ताविक केले.संगीत विभागाची प्रगती अभिमानास्पद आहे असे मत नंदकुमारजी झावरे पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर विभागप्रमुख निलेश खळीकर यांची शास्त्रीय व फ्युजनची संगीत मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. त्यांना शेखर दरवडे (तबला) आनंद मकासरे (ड्रम) संके सुवर्णपाठकी(संवादिनी) ऋषिकेश कुल्हट (पखावज) ऋषि सागडे (गिटार) या सर्वांनी सुंदर साथ करून दाद मिळवली. निवेदन प्रा.उद्धव उगले तर डॉ. बी.बी.सागडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment