नागरी समस्या नागरिकांच्या समन्वयातूनच सोडविण्याचा प्रयत्न - आयुक्त शंकर गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

नागरी समस्या नागरिकांच्या समन्वयातूनच सोडविण्याचा प्रयत्न - आयुक्त शंकर गोरे

 नागरी समस्या नागरिकांच्या समन्वयातूनच सोडविण्याचा प्रयत्न - आयुक्त शंकर गोरे

करोना प्रादुर्भावामुळे कोविड सेंटर सक्षम...   


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी कोविडची लस घेतलीच पाहिजे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात येत आहेत. कोविडचा प्रसार होऊ नये, यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे. महापालिकेतील पायाभूत सेवा सुविधा व बजेटमधील निधी पाहूनच विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. शहरातील सर्व रस्ते दुरूस्तीसाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरी समस्या या नागरिकांच्या समन्वयातूनच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केले.
आयुक्त शंकर गोरे यांनी काल महापालिकेत आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला.तसेच पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होत आहे. असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की नगरमधून कोरोना हद्दपार करण्यासाठी कोविड कामाला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी महापालिकेतील राष्ट्रीय आरोग्य अभियाना (एनएचएम)च्या सर्व रिक्त जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत. पुरेशा औषधांचा स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment