कर्जत तालुका सहजोग परिवाराच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित कर्जत तालुका सहजयोग परिवाराच्यावतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम विठ्ठल मंदिर झारेकर गल्ली, कर्जत याठिकाणी घेण्यात आले. यावेळी कर्जत शहरातील व परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहज भजन संध्या गणेश बैरागी यांनी घेतली त्यानंतर उपस्थित महिलांना सहजयोग ध्यान साधना, कुंडलिनी शक्ती जागृतीचा व आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात सहजयोगी युवाशक्ती कु. पूर्वजा बोज्जा ही कथक पदवीका परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत माजी नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांनी केले सहज योगाची माहिती गणेश भुजबळ यांनी दिली. आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम मेजर कुंडलिक ढाकणे यांनी घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्जत तालुका सहजोग परिवार प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर मुळे यांनी केले. शेवटी आभार जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्जत येथील ध्यान केंद्र प्रमुख कानडे काका, सहजयोगी महिला सौ. सुजाता शहाणे, सौ. कमल कानडे, सौ. फलके, सौ. स्वाती कोळे, सौ. कविता सूर्यवंशी, सौ. यशोदा नेवसे, सौ. पाठक, सौ.शकुंतला कानडे, सौ. सरोज कानडे, सौ. अंदे, सौ. भुजबळ, सौ. ढाकणे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment