नगरच्या खेळाडूंमध्ये शहराला क्रीडानगरीचे वैभव मिळवून देण्याची क्षमता ः आ. लहू कानडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

नगरच्या खेळाडूंमध्ये शहराला क्रीडानगरीचे वैभव मिळवून देण्याची क्षमता ः आ. लहू कानडे

 नगरच्या खेळाडूंमध्ये शहराला क्रीडानगरीचे वैभव मिळवून देण्याची क्षमता ः आ. लहू कानडे

ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडापटूंचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्ननगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेले अनेक उत्तम खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये शहराला क्रीडा नगरीचे वैभव मिळवून देण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले आहे. नगर शहर काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहराचा नावलौकिक वाढविणार्‍या राष्ट्रीय खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी आ.कानडे बोलत होते. सावेडी उपनगरातील प्रभाग क्र.1 मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.
आ. कानडे म्हणाले की, काँग्रेसच्या क्रीडा विभागाने क्रीडा क्षेत्रातल्या प्रश्नां संदर्भात घेतलेला पुढाकार हा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. क्रीडा विभागाला अधिक सक्षम पणे उभे करण्यासाठी बळ देण्याचे काम पक्षाच्यावतीने निश्चितपणे केले जाईल. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, सावेडी उपनगरामध्ये क्रीडापटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले जाईल. क्रीडामंत्री ना.सुनील केदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्याकडे पाठपुरावा करून शहरातील खेळाडूंचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्या मागे ना.बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या माध्यमातून ताकद उभी करण्यासाठी मी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा राहिल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह मच्छिंद्र साळुंखे, नारायण कराळे, महेश गायकवाड, सर्फराज सय्यद, सकट सर, आदित्य क्षीरसागर, आदिल सय्यद, प्रसाद पाटोळे, गणेश वंजारी, सुरेश वाघ तसेच शहर काँग्रेस क्रीडा विभागाच्या पदाधिकारी, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण गीते पाटील यांनी केले. सूत्रसंचालन काँग्रेसचे शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी केले. आभार मच्छिंद्र साळुंके यांनी मानले. यावेळी  जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,नगर तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, खलील सय्यद, सेवादलाचे डॉ.मनोज लोंढे, निजाम जागीरदार, नाथाभाऊ अल्हाट, अनंतराव गारदे, आय.बी. शहा, अनिस चुडीवाल, प्रशांत वाघ, डॉ. रिजवान सय्यद, मुबीन शेख, मोहनराव वाखुरे, अजय मिसाळ, गणेश आपरे, निसार बागवान, कविताताई कानडे, उषाताई भगत, कौसर खान, नीता बर्वे, डॉ.जाहिदा शेख आदींसह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्तथरारक शिवकालीन खेळांचे सादरीकरण
  सन्मान सोहळ्या निमित्त शिवकालीन मर्दानी चित्तथरारक खेळांचे सादरीकरण पार पडले. नेवासाच्या सुरेश लव्हाटे आणि 25 खेळाडूंच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दानपट्टा, तलवारबाजी, भाला असे विविध खेळाचे सादरीकरण यावेळी केले. यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता हे विशेष. हे खेळ पाहण्यासाठी सावेडी उपनगरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here