राज्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस मागणार नाही ः नाना पटोले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

राज्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस मागणार नाही ः नाना पटोले

 राज्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस मागणार नाही ः नाना पटोले


मुंबई ः आपल्या देशात जी धोरणे इंदिरा गांधी यांनी आणली त्याच धोरणांची अंमलबजावणी पुढे मनमोहन सिंग सरकारपर्यंत चालत राहिली. त्याच धोरणाला पलटणी देऊन देशामध्ये एक माणूस शेतकरी व्हावा आणि बाकी शेतकरी उद्धवस्त व्हावा, शेतकरी तो 1 माणूस उद्योगपती व्हावा अशा प्रकारचे धोरण काँग्रेसचे नाही. काँग्रेस ही शेतकर्‍यांना राहणारी पार्टी आहे. काँग्रेस हे शेतकर्‍यांचे उद्धर करणारं आहे म्हणून काँग्रेस हे पापाचे काम कधी करणार नाही असे नवनिर्वाचित महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्यात उपमुख्यमंत्री पद मागणार नाही. पक्षातील ओबीसी नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही आहेत. पक्ष श्रेष्ठी सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाणे हे सरकार चालेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद दरम्यान म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत नाना पटोलेंना विचारण्यात आले होते यावर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलन मागे घेण्याचे मोदींनी आवाहन केल्याच्या प्रश्नावर नाना पटोलेंनी सांगितले की, शेतकर्‍यांनी आंदोलन केले तेव्हा वारंवार मोदींना पत्रव्यवहार केला आहे. जे तीन कायदे आणले आहेत ते चुकीचे आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी उद्धवस्त होईल. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकायला गेला नाही. आता पंतप्रधान कोणत्या अधिकारानं शेतकर्‍यांना आंदोलन थांबवायला सांगत आहेत.
ज्यांना शेतीतली ए,बी,सी,डी माहित नाही. जे रेल्वेमंत्री आहेत त्यांना शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले यामुळे केंद्राने शेतकर्‍यांना धोका दिल्याचे काम केले आहे. म्हणून शेतकर्‍यांना आता आवाहन करुन काहीही अर्थ राहणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here