खर्डा व परिसरात अवकाळी पावसाने नुकसान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 22, 2021

खर्डा व परिसरात अवकाळी पावसाने नुकसान

 खर्डा व परिसरात अवकाळी पावसाने नुकसान 


खर्डा -
  खर्डा व परिसरात अवकाळी पाऊस आल्याने हजारो एकर शेतातील ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास हिराऊन जाण्याची भीती आता बळीराजा वाटत आहे .
रब्बी हंगामातील मुख्य पीक प्रामुख्याने ज्वारी ,हरबरा गहू घेतले जाते .मागील काही दिवसांपूर्वी ज्वारी वर लष्करी आळीमुळे  पाने कुरतडून पिकांची वाढ खुंटले होते त्यामुळे शेतकरी वर्गाला फवारणी साठी औषधाचे  खर्च सोसावा लागला आणि आता सुगीचे दिवस त्यात काढणीसाठी मजुरांची कमतरता अशा अनेक संकटातुन शेतकरी मार्ग काढत आहे .अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा 
 फटका बसला आहे. 
     खर्डा सह परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील ज्वारीचे कणसे व कडबा भिजल्याने  चारा टंचाईच्या संकटास शेतकऱ्याला सामोरे जाण्याची वेळ आले आहे .सुगीच्या काढणीच्या वेळी नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे .
 हजारो एकर असलेले  ज्वारी,गहू ,हरबरा तसेच वाऱ्यामुळे आंब्याला आलेला  मोहर पडल्याने पिकांचे नुकसान झाले आहे .
       खर्डा सह जातेगाव ,दिघोळ, मोहरी,गवळवाडी ,गीतेवाडी, तरडगाव सातेफळ ,मुंगेवाडी,नागोबाचीवाडी  आदी भागातही नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here