सायकलप्रेमींचा आम्ही कर्जतचे सेवेकरी यांच्यावतीने सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

सायकलप्रेमींचा आम्ही कर्जतचे सेवेकरी यांच्यावतीने सत्कार

 सायकलप्रेमींचा आम्ही कर्जतचे सेवेकरी यांच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः  श्रमदान ही कोठेही इव्हेंट आहे मात्र कर्जत मध्ये श्रमदान हॅबीट बनले आहे व कर्जतकर खरोखर वेडे आहेत आपण या अभियानात फक्त कर्जत कर यात म्हणून काम करूया असे आवाहन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केले. बाजारतळ येथे सायकल प्रेमींचा सत्कार आम्ही कर्जतचे सेवेकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
कर्जत येथे स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अंतर्गत गेली 123 दिवसापासून श्रमदान करून स्वच्छता करणार्‍या सामाजिक संघटनाच्या टीम मधील सायकल प्रेमींनी नुकतीच कर्जत ते पंढरपूर ही पर्यावरण पूरक रॅली सायकल वर पूर्ण केली असुन या सर्वाचा आम्ही कर्जतचे सेवेकरी यांच्या वतीने बाजारतळ येथे सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात शहरातील भिंती ना बोलक्या करणारे कला शिक्षक सुनील भोसले यांचाही खास सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी यांनी ओंकार कुलकर्णी, रुद्र भिसे, सचिन पोटरे,  फारूक बेग, गिरीश गुंड यांनी मनोगते व्यक्त केली. नागरिकांनी सायकलचा वापर केल्यास नक्कीच शहराची प्रदूषण पातळी कमी होणार आहे यासाठी कर्जत मधील सायकलप्रेमींनी सुरू केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे, शहरातील प्रत्येक नागरिक सायकल वापरतील हा दिवस आपल्याला पाहायचा आहे यासाठी सायकल स्पर्धा घेऊ असे प्रतिपादन यावेळी उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी व्यक्त केले, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी बोलताना कर्जतमध्ये होत असलेल्या कामाबाबत अजूनही विश्वास बसत नाही स्वच्छतेच्या कामात खरोखर कर्जतकर वेडे झाले आहेत असे म्हटले, कर्जत मध्ये सुरू असलेल्या कामावर अनेकांचा अद्यापही विश्वास बसत नाही मात्र कर्जत मध्ये इतिहास नक्की घडत आहे आपण सर्व फक्त कर्जतकर म्हणून काम करूया असे आवाहन केले. शेवटी निखिल सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक लांगोरे यांनी केले.मुख्याधिकारी गोविंद जाधव, नितीन देशमुख, अक्षय राऊत, अतुलशेठ कुलथे, राहुल नवले, तात्या क्षीरसागर, घनश्याम नाळे, दीपक माने, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, महेश राऊत, सुमितजी राऊत,शुभम क्षीरसागर, प्रतिक राऊत, प्रदीप कळसाईत, माऊली थोरात, गणेश सातव, गिरीश गुंड, अशिष शेटे, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामदेव राऊत, सचिन पोटरे, वैभव शहा, सुनील निलंगे आदी सह अनेक सेवेकरी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here