राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्व टीमचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 15, 2021

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्व टीमचा सत्कार

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्व टीमचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने जामखेड तालुक्यातील होतकरू मल्लांसाठी तालुका निवड कुस्ती स्पर्धा घेण्यात आलेली होती  दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जामखेड येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणेअहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर ,संचालक मकरंद आबा काशीद, नगराध्यक्ष निखिल घायतडक, भाजपाचे तालुका अध्यक्ष अजय काशीद, हनुमंत जाधव,नगरसेवक मोहन पवार,आत्माराम बेडके यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

यावेळी पहिली कुस्ती जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. तसेच या स्पर्धेसाठी आयोजक बबन( काका) काशीद , इस्माईल शेख, मयूर भोसले सर, किशोर सातपुते ,डॉ. हजारे तसेच या स्पर्धेसाठी पंच म्हणून संभाजी निकाळजे व ईश्वर तोरडमल यांनी काम पाहिले तसेच या स्पर्धेसाठी सत्तर मल्लांनी सहभाग नोंदविला.  तसेच जामखेड मध्ये राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन 2021 घेण्यात आलेल्या होती या मॅरेथॉनमध्ये पंच, व्यवस्था, नियोजन यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्व टीमचा माननीय उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या वतीने आभार पत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
 या वेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादीचे नेते व क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक मधुकर  आबा  राळेभात,प्राचार्य सुभाष फाळके,प्राचार्य हरिभाऊ ढवळे, कॅप्टन लक्ष्मण भोरे,हनुमंत जाधव,प्रफुल्ल सोळंकी मयूर भोसले सर ,रमेश बोलभट, आदी मान्यवर उपस्थित होते.
उप महाराष्ट्र केशरी बबन काका काशीद यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी झाली यापुढेही मल्लविद्या संस्कार फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येणार आहे असे मत व्यक्त केले.
तसेच अमोल गिरमे,सोमनाथ शिंदे,कॅप्टन लक्ष्मण भोरे,प्राचार्य सुभाष फाळके, यांनी मनोगत व्यक्त केले.
नंतर आठ किलोमीटर पंच, पंधरा किलोमीटर पुरुष विभाग पंच  व नियोजनातील सर्वांचा आभार पत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.   प्रा मधुकर आबा राळेभात यांनी सर्वांना मार्गदर्शन करून आभार  मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here