महावीर भवन समोरील प्रांगणातील काँक्रिटीकरण्यासाठी आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून निधी मंजूर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 5, 2021

महावीर भवन समोरील प्रांगणातील काँक्रिटीकरण्यासाठी आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून निधी मंजूर.

 महावीर भवन समोरील प्रांगणातील काँक्रिटीकरण्यासाठी आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून निधी मंजूर.


जामखेड -
 जैन समाजातील महावीर भवन  येथील पुढील प्रांगणात काँक्रिटीकरण लोकप्रिय आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नाने आठ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्या कामाचा उद्घाटन समारंभ श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी, कांतीलाल भळगट, कुंदनशेठ भंडारी, यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी राजेंद्र कोठारी ,मधुकर आबा राळेभात ,दत्ताभाऊ वारे,मा.नगराध्यक्ष विकास राळेभात, उमर कुरेशी ,नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव , राजेंद्र गोरे,वैजीनाथ पोले,प्रकाश सदाफुले, नरेंद्र जाधव, प्रा.राहुल आहिरे सर,कॉग्रेसचे राहुल उगले,कोअर कमिटीचे सदस्य बाळू डोकडे,जुबेर शेख,आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले महावीर भवन च्या प्रांगणामध्ये नेहमी पाणी साचत होते म्हणून मी रोहितदादा पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांनी ताबडतोब मंजुरी दिली आणि निधी उपलब्ध केला आहे थोड्या दिवसात कामाला सुरुवात होणार आहे यावेळी जैन श्रावक संघाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस मा. राजेंद्र कोठारी ,कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.मधुकर आबा राळेभात,तालुकाध्यक्ष मा. दत्ताभाऊ वारे ,आणि नगरसेवक दिगंबर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here