7 लाख रुपयांची विजचोरी, गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

7 लाख रुपयांची विजचोरी, गुन्हा दाखल

 7 लाख रुपयांची विजचोरी, गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील खोसपुरी शिवारातील ’हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’च्या मालकाने वीज मीटरमध्ये फेरफार करून सुमारे सात लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप जरे आणि भारत शेटे या दोघांविरोधात वीज चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
अतिरीक्त कार्यकारी अभियंता सावंत, सहायक अभियंता गफ्फार मेहताब शेख, कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, सहायक सुरक्षा अधिकारी शशीकुमार तांबे, तंत्रज्ञ यशवंत वेदपाठक या पथकाने ’हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’ मधील व्यवसायिक वीज मीटरची तपासणी केली होती.तेव्हा ते मीटर हाताळलेले दिसले. मीटरच्या उजव्या बाजूला छोटे छिद्र पाडण्यात आल्याचे दिसून आले.
त्यानंतर डिस्प्ले आणि टोंगरटेस्ट वरील करंटमध्ये तफावत दिसली. पथकाने अधिक तपासणीसाठी वीज मीटर ताब्यात घेतले. त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करण्यात आली. अहमदनगर येथील कक्ष चाचणीत मीटर तापसण्यात आले. येथे मीटरची बारकाईने तपासणी केल्यावर मीटरमधील सीटीच्या ’आर-फेज’ आणि ’वाय-फेज’ची लाल रंगाची वायर तोडलेली दिसली. वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये कमी व्हावी, यासाठी ही कायमस्वरूपी व्यवस्था करून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. या व्यावसायिकाने दोन वर्षांच्या कालावधीत महावितरण कंपनीचे 37 हजार, 180 युनिटची वीज चोरी केली. त्याचे बिल सहा लाख, 90 हजार रुपये होते. यानुसार महावितरणच्या अधिकार्‍यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी संदीप जरे आणि भारत शेटे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

No comments:

Post a Comment