नगरसेविका कुर्‍हे यांच्या माध्यमातून वॉर्ड क्र.6 च्या विकासकामाला सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

नगरसेविका कुर्‍हे यांच्या माध्यमातून वॉर्ड क्र.6 च्या विकासकामाला सुरुवात

 नगरसेविका कुर्‍हे यांच्या माध्यमातून वॉर्ड क्र.6 च्या विकासकामाला सुरुवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा नगर पंचायतीच्या वॉर्ड   नंबर 6 च्या नगरसेविका सौ.   अर्चना जितेंद्र कुर्‍हे  यांच्या प्रयत्नांमुळे  वॉर्डामधील विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली.
वॉर्डातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे  करण्याचे काम त्यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले.नुकतेच दहिवाळकर यांचे  घर ते कदम यांचे घरापर्यंत जो अनेक वर्षांपासून मातीचा रस्ता होता त्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटचे पक्क्या रस्त्यात  रूपांतर करण्यात आले .अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण केली जातील असे आश्वासन या वेळी श्री जितेंद्र कुर्‍हे यांनी दिले.
यावेळी मनोज नहार, कदम नाना  , श्री मोरे सर, श्री पंडित,इम्रान शेख , साळवे सर आधी परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावून  कुर्‍हे   यांच्याविषयी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment