सराटेे वडगावने तालुकास्तरीय 10 लाखाचे बक्षीस जिंकले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 12, 2021

सराटेे वडगावने तालुकास्तरीय 10 लाखाचे बक्षीस जिंकले

 सराटेे वडगावने तालुकास्तरीय 10 लाखाचे बक्षीस जिंकले

आर. आर. आबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेसाठी जिल्हास्तरीय टीमने केली पाहणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः तालुक्यातील सराटे वडगाव येथे आर आर आबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजना अंतर्गत तालुकास्तरीय दहा लाखांच बक्षीस जिंकले आहे. आणि पुन्हा जिल्हा स्तरीय वीस लक्ष रुपयांचं बक्षीस जिंकण्यासाठी गावाची कहानी करण्यासाठी जिल्हास्तरीय पाहणी आली होती.
आनंद भंडारी  अध्यक्ष तपासणी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद बीड, प्रमोद काळे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, हाळीकर साहेब सदस्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बीड,डॉ. पवार, सदस्य तथा जिल्हा आरोग्य अधिकारी बीड, आव्हाड सदस्य तथा लेखा अधिकारी जिल्हा परिषद बीड,  खेडकर साहेब सदस्य तथा कृषी अधिकारी पंचायत समिती बीड, सुधाकर मुंडे ,गटविकास अधिकारी आष्टी, आनंतरे साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती आष्टी,बागलाने साहेब विस्तार अधिकारी आष्टी हे सर्व मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
तसेच गावांमधील प्रतिष्ठित व्यक्ती,महिला, जिल्हा परिषद शिक्षक,ग्रामसेवक, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,प्राध्यापक वर्ग,पत्रकार बंधुं,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते,आलेल्या अधिकार्‍यांचे टाळ पखवाज वाजून स्वागत करण्यात आले.  पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला .व पुढे आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.व दैनिक झुंजार नेता वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी सर्वांचे आभार मानले. व पुढे गावांमधील स्वच्छता व जलसंधारणाची कामे तसेच ग्रामपंचायत अहवाला पाहानी केली  त्यानंतर गावाला पुढील वाटचालीस   शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here