हॉटेल न्यू पारिजातचे हंडीनिमगाव येथे मोठ्या थाटामाटात उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

हॉटेल न्यू पारिजातचे हंडीनिमगाव येथे मोठ्या थाटामाटात उद्घाटन

 हॉटेल न्यू पारिजातचे हंडीनिमगाव येथे मोठ्या थाटामाटात उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः नेवासा तालुक्यातील हॉटेल व्यवसायामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून  अग्रेसर असणार्या  साळुंके परिवाराचे  हॉटेल न्यू पारिजातचे काल मोठ्या थाटामाटात त्यांच्या मातोश्री जनाबाई एकनाथ साळुंके आणि ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.
   गेल्या वीस वर्षांपासून नगर औरंगाबाद हायवे शेजारीच  हंडीनिमगाव शिवारात असणार्या आपल्या हॉटेल पारिजातचे नूतनीकरण करून साळुंके परिवाराने  अतिशय आकर्षक असे नवीन हॉटेल ग्राहकांसाठी आजपासून खुले केले .
   या वेळी सांगळे महाराज, मंगेश महाराज , तसेच हंडीनिमगाव नेवासा फाटा आणि भानसहिवरा परिसरातील सर्व मान्यवर आणि सगेसोयरे उपस्थित होते .

No comments:

Post a Comment