ट्रॅक्टर तिरंगा रॅलीद्वारे मोदी सरकारला चले जाव ची हाक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

ट्रॅक्टर तिरंगा रॅलीद्वारे मोदी सरकारला चले जाव ची हाक

 ट्रॅक्टर तिरंगा रॅलीद्वारे मोदी सरकारला चले जाव ची हाक

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी प्रजासत्ताकदिनी शहरातून ट्रॅक्टरचे संचलन

जय जवान, जय किसानच्या घोषणा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताकदिनी शहरातून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली. जय जवान, जय किसानच्या घोषणा देत ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज फडकवून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.
सकाळी 11 वाजता मार्केटयार्ड येथे जमून ट्रॅक्टर तिरंगा रॅली नगर-पुणे महामार्गावर आली. जुने बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज व मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात झाली. दोन महिन्यापासून दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करणार्या शेतकर्‍यांची दखल न घेणार्‍या केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे विकास गेरंगे, धोंडीभाऊ सातपुते, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, हरजितसिंह वधवा, सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, रमेश नागवडे, आनंद वायकर, आर्किटेक अर्शद शेख, युनूस तांबटकर, संध्या मेढे, रामदास वागस्कर, सतीश पवार, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, समिक्षा वाकळे, समृध्दी वाकळे, भाऊसाहेब थोटे, रविंद्र फुलसौंदर, फारुक रंगरेज, कार्तिक पासळकर, तुषार सोनवणे, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, शाहीर कान्हू सुंबे आदी सहभागी झाले होते.
दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी 26 नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला दोन महिने उलटले असले तरी, केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. शेतकरी नेत्यांना सरकारने अकरा वेळा फक्त चर्चेला बोलावून आपली आडमुठी भूमिका दर्शवली आहे. शेतकरी विरोधी असलेले नवीन काळे कायदे रद्द होण्यासाठी देशातील शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्यांच्या भावना तीव्र असताना सरकार जनमताचे अनादर करीत आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात 147 आंदोलक शेतकर्‍यांचे बलिदान गेले असून, याला भाजप सरकार जबाबदार असल्याचे समन्वय समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी देशातील विविध भागात प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नगर-पुणे महामार्गावरुन कोठी, चांदणी चौक, कोठला मैदान, डीएसपी चौक ते तारकपूर मार्गे ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे संचलन होऊन पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंग स्मारक येथे या रॅलीचा समारोप झाला. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे नातू इंजी. प्रशांत पाटील व प्राची पाटील यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषा परिधान करुन रॅलीत सहभागी झाले होते.

सदर रॅलीचे समारोप ठिकाण जाहीर करण्यात आले होते. तरी देखील महापालिकेतील भाजपच्या सत्ताधार्यांनी प्रजासत्ताकदिनी शहिद भगतसिंह स्मारकाला कुलूप लाऊन बंद ठेवण्यात आल्याचा माजी विरोधी पक्ष नेते कॉ.भैरवनाथ वाकळे यांनी निषेध नोंदवला.

No comments:

Post a Comment