श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियानात महावीर चषक परिवाराचे एक लाख अकरा हजाराचे योगदान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियानात महावीर चषक परिवाराचे एक लाख अकरा हजाराचे योगदान.

 श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियानात महावीर चषक परिवाराचे एक लाख अकरा हजाराचे योगदान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मार्निग ग्रुप व महावीर चषक परिवाराने फक्त क्रीडा क्ष्रेत्रा पुरते मर्यादित न राहता सामाजिक भान जोपासत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सध्या देशात राममंदिर बनविण्यासाठी निधी संकलन कार्य वेगाने सुरु असून त्यात खारीचा वाटा व सर्वांना योगदानाची संधी मिळावी याहेतूने श्रीराम मंदिर जन्मभूमी निधी समर्पण अभियानात आपलाही सहभाग असावा या हेतूने महावीर चषक परिवारातर्फे  एक लाख अकरा हजाराचे योगदान देण्यात आले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात मर्चंट बँक चेअरमन आनंदराम  मुनोत यांच्या हस्ते निधीचा धनादेश जनकल्याण रक्तपेढी अध्यक्ष श्री राजेश झंवर यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी मार्केटयार्ड मधील शेटीया व पोखरणा परिवारातर्फे उस्फुर्ततेने एक्काव्वन हजारांचा धनादेश समर्पण निधी साठी देण्यात आला.या प्रसंगी व्यासपीठावर वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष  विश्वनाथअन्ना राऊत, शहर उपकार्यवाहक हिराभाऊ रामदासी, मर्चंट बँक संचालक संजय चोपडा उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संजय चोपडा यांनी केले, महावीर चषक परिवार त्याचे कार्य व संकल्पना या विषयी त्यांनी माहिती दिली.कोरोना काळात गरजूंना तसेच संस्थांना मदत करण्याची संधी मिळाली व त्यास सर्वांनी साथ दिली या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राजेंद्र गांधी यांनी राम मंदिर उभारणीत योगदान असावे हि सर्वांची इच्छा या निधी समर्पण अभियानाने निश्चित पूर्ण होत आहे .सर्वसामान्य पासून ते श्रीमंत सर्वांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम देशाला नवी दिशा देणारा असेल असे सांगितले. राजेश झंवर यांनी सांगितले की, श्रीराम मंदिर उभारणीसाठी संकलन नव्हे तर  निधी समर्पण अभियान  राबविल्याने हमाल, मजुरी करणारे, छोटे व्यावसायिक यांनाही मंदिर उभारणीसाठी योगदान देता आले व त्यामुळे सर्वांना ते आपले मंदिर वाटेल व जगात त्याची नोंद होईल. याप्रसंगी हेमंत दोशी, प्रवीण शिंगवी, प्रफुल्ल मुथा, सचिन कटारिया, अतुल शेटीया, रुपेश कटारिया, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तातेड, अनिल दुग्गड, लक्ष्मिकांत शेटीया, रुपेश भंडारी, आनंद कटारिया,मयूर पितळे,विकास सुराणा,दिनेश चंगेडीया, राहुल शिंदे, प्रतीभ पोखरणा, निखील गुगळे उपस्थितांचे आभार प्रवीण शिंगवी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here