काळे झेंडे दाखवणार्‍यांवर गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

काळे झेंडे दाखवणार्‍यांवर गुन्हा दाखल

 काळे झेंडे दाखवणार्‍यांवर गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रजासत्ताक दिनी शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच कोणत्याही प्रकारचे मास्क, रुमाल व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता, पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, हमारी माँगे पुरी करो. अशा घोषणा देण्यात आल्या.

सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे, त्यांच्यावर कलम 188/269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील व महापालिका परिसरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. शहरातील चौकातील बंद पडलेले सिग्नल व अनधिकृत थांबलेली वाहणे व बेशिस्त पार्किंगमुळे दिवसेंदिवस शहर विद्रपीकरणात भर पडत आहे. त्यामुळे शहर एक मोठे खेडे दिसून येत आहे. याला संपूर्ण वाहतूक शाखा जबाबदार आहे. शहर सुरक्षा सप्ताह हा वाहतूक शाखेकडून राबविलेला जात आहे. परंतु वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. वाहतुकीबाबत शहराची दयनिय अवस्था झालेली आहे. तसेच आरटीओच्या दुर्लक्षामुळे शहरातू राजरोसपणे जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे अपघात होऊन नगर शहरातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यांच्यावर वाहतूक पोलिस कुठलीही कारवाई करत नाही. हे मोठे आश्चर्य आहे. गोर- गरीब नागरिकांना फक्त नियम दाखवून पावत्या फाडायचे काम चालू असते.
तसेच जड वाहतुकीला प्रवेश नसतांना सुद्धा ट्राफिक पोलिस ही वाहने दिवसा शहरात सोडतात व त्यामुळे आतापर्यंत 700 ते 800 बळी या वर्षाअखेर घेतलेले आहेत. ही मोठी शहराची शोकांतिका आहे. तसेच शहरात मोठ-मोठ रस्त्यावर व चौकातील सिग्नलवर मोकाट, भटकी जनावरे एखाद्या लग्नाच्या वर्‍हाडासारखी उभी असतात. त्यामुळे दुर्घटना होतात. वाहतूक पोलिस हे फक्त बघ्याची भुमिका घेतात हे आश्चर्य आहे. हायवेच्या ठिकाणी मोठ-मोठी चाय स्पॉट व हॉटेल्स, गॅरेज हायवेला झालेले असून, याची सर्व पार्किंग रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. यामुळे सामान्य नागरिकाला जीव गमवावा लागत आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी बंद गाड्या आणि भंगार साहित्याचा साठा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या गोष्टींकडे कोणाचेही लक्ष नाही.
शहर विकासासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे व कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असतो. परंतु या गोष्टींकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शिव राष्ट्र सेना 26 जानेवारी रोजी लालटाकी येथे काळे झेंडे दाखवून निषेध केला, अशी माहिती शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे यांनी दिली. तसेच असे माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी आंदोलन करत राहणार असे नवसुपे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here