एलसीबीची कारवाही एका वर्षापासून फरार असलेला गुन्हेगार हरिष नेटके अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

एलसीबीची कारवाही एका वर्षापासून फरार असलेला गुन्हेगार हरिष नेटके अटक

 एलसीबीची कारवाही एका वर्षापासून फरार असलेला गुन्हेगार हरिष नेटके अटक नगरी दवंडी

 अहमदनगर -

खुनाचा प्रयत्न करणारा व गेल्या एका वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार हरिष नेटके यास अटक करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपी आरोपी दया उर्फ बोंद्या नेटके व त्याचा भाऊ हरिष नेटके (दोघे रा. लालटाकी, अहदनगर) यांनी मागील जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी तात्या हरी खंडागळे (रा. लालटाकी, अहमदनगर) यांचा मुलगा प्रकाश तात्या खंडागळे यास धारदार हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत फिर्यादीवरुन कलम 307, 323 प्रमाणे नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी बोंद्या उर्फ दया मच्छिंद्र नेटके यास अटक करण्यात आलेली होती. परंतू मुख्य आरोपी हरीष नेटके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपीचा शोध घेताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, आरोपी हरीष नेटके हा शहरातील बोरुडे मळा परिसरात लपून छपून वास्तव्य करत आहे. माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोहेकॉ. बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, पोना. संदीप पवार, शंकर चौधरी यांनी बोरुडे मळा परिसरात जावून सापळा लावून आरोपी हरिष उर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके यास ताब्यात घेतले. आरोपीला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत. आरोपी हरिष उर्फ कोंड्या मच्छिन्द्र नेटके याच्याविरुध्द यापुर्वी तोफखाना पोलिस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार आग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here