पाणी प्रश्नी बिशप लॉईड कॉलनीच्या नागरिकांचा महापालिकेत ठिय्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

पाणी प्रश्नी बिशप लॉईड कॉलनीच्या नागरिकांचा महापालिकेत ठिय्या

 पाणी प्रश्नी बिशप लॉईड कॉलनीच्या नागरिकांचा महापालिकेत ठिय्या

युवक काँग्रेसच्या पुढाकाराने

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  सावेडी येथील बिशप लॉईड कॉलनीत पाणी प्रश्न गंभीर बनला असताना स्थानिक नागरिकांनी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने महापालिकेत रिकामे हंडे घेऊन येऊन ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर पाटोळे, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान शेख, युवक काँग्रेसचे गणेश भोसले, योगेश काळे, देवेंद्र कडू, शिवाजी जाधव, रोहन काकडे, अमित थोरात, संगीता क्षेत्रे, पुष्पा जाधव, कांचन वाघमारे, सुनील वाघमारे, बी.बी. पगारे, रेखा अल्हाट, पुष्पा जाधव, कांचन वाघमारे आदींसह नागरिक उपस्थित होते.
बिशप लॉईड कॉलनीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका या प्रश्नाकडे दखल घेत नसल्याने युवक काँग्रेसच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी आंदोलन करुन महापालिकेत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी मनपा प्रशासन, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा समन्वय साधून सदर प्रश्नावर लवकरच बैठक घेऊन पाणी प्रश्न सोडविण्याचे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here