तिरंगामय वातावरणात कापडबाजारात प्रजासत्ताक दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

तिरंगामय वातावरणात कापडबाजारात प्रजासत्ताक दिन साजरा

 तिरंगामय वातावरणात कापडबाजारात प्रजासत्ताक दिन साजरा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कापडबाजारातील वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळाच्यावतीने भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कापडबाजारात तिरंगी सजावट आणि व्यासपीठ उभारुन झेंडावंदन करण्यात आले. सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार, समता, समानता प्रदान करणार्या भारतीय संविधानाप्रती कायम निष्ठा बाळगण्याचा संकल्प करीत सर्वांनी तिरंग्याला सलामी दिली व सामुहिरित्या राष्ट्रगीत म्हणत्यात आले. दिवसभर याठिकाणी देशभक्तीपर गीतांचा निनाद चालू होता. भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणांमुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते.
कापडबाजारातील ध्वजारोहण व भारत माता पूजन कार्यक्रम एम.जी.रोडवरील ज्येष्ठ व्यापारी पोपटशेठ कटारिया, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मुथा, व्यापारी क्लबचे सेके्रटरी विजय गुगळे, कापडबाजार श्रीगणेश मित्र मंडळाचे आधारस्तंभ अशोक उपाध्ये, किरण सोनग्रा, जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर अशोक बोरा, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, ह.भ.प. दुतारे महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक बोगावत, महावीर कांकरिया, चिंटु खंडेलवाल, भैय्या भांडेकर, आदित्य गांधी, प्रतिक गोयल, राहुल देडगांवकर, मनिष सोनग्रा, विजु आहेर, विक्रम नारंग, कुणाल नारंग, हेमंत रासने, चंदन पवार, संभव काठेड, रवी कराचीवाला, संदिप बायड, अमित नवलानी, हर्षल पेटकर, कैलास मोहिरे, अमोल देडगांवकर, यश मिरांडे, गोपाल सारडा आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here