देश संकटातून लवकरच बाहेर पडेल ः भुजबळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

देश संकटातून लवकरच बाहेर पडेल ः भुजबळ

 देश संकटातून लवकरच बाहेर पडेल ः भुजबळ

मंगलगेट येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः देशातील कोरोनाचे सावट लवकरच दूर होऊन पुन्हा आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. सध्या देश अनेक संकटांमधून जात आहे. हे संकटांचे मळभही लवकरच दूर होईल असा आशावाद व्यक्त करून प्रजासत्तक दीना निमित्त उपस्थितांना ओबीसी चे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या.
शहरातील मंगलगेट भागात काँग्रेच्या वतीने पक्ष संपर्क कार्यालयात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा सरचिटणीस उबेद शेख यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी भिंगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.आर.पिल्ले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शाम वाघस्कर , माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, निवृत्त पोलीस निरीक्षक एम.आय.शेख , अल्प संख्यांक विभागाचे प्रदेश सर चिटणीस फिरोज शफी खान , सलीम रेडियम वाला,भिंगार महिला आघाडी अध्यक्षा मार्गरेट जाधव,शहर जिल्हाध्यक्षा सविता मोरे,रजनी ताठे,सरचिटणीस अभिजित कांबळे,मुकुंद लखापती,उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी,शशिकांत पवार, संतोष धीवर,अनिल वर्‍हाडे,इंजि.संजय खडके, विवेक येवले ,ड नरेंद्र भिंगारदिवे,संजय झोडगे, रमेश कदम, निझाम पठाण, राजेश बाठीया, सुभाष रणदिवे, फर्दिन खान आणि फैजल खान  आदी उपस्थित होते.
यावेळी भिंगार शहर काँग्रेस अध्यक्ष आर.आर.पिल्ले,उबेद शेख यांची भाषणे झाली. देशभक्तीपर घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शाम वाघस्कर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here