मुकुंदनगर येथे आमदार जगतापांच्या हस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

मुकुंदनगर येथे आमदार जगतापांच्या हस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

 मुकुंदनगर येथे आमदार जगतापांच्या हस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुकुंदनगर भागातील प्रभाग क्र.3 मधील दरबार चौक ते शहादत किराणा स्टोअर्स येथील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक समाज खान, नगरसेविका शेख रिजवाना फारुख, सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख, युसुफ इनामदार, आरिफ पठाण, रौफ शेख, फारुख गुलाब शेख, सलीम सय्यद, शकील सय्यद, साजिद इब्राहीम, शेख बशीर पठाण आधी पदाधिकारी नागरिक आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, शहरामध्ये गेल्या काही दिवसापांसून कोरोनामुळे अनेक ठिकाणी विकास कामांना खिळ बसली होती. मात्र, आता हळु हळु परस्थिती पुर्णपदावर येत असुन शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाणी योजनांचे काम प्रगतीपथावर सुरु करण्यात आले आहे. नागरीकांना सोई सुविधा मिळाव्यात, कोणत्याही प्रकारचे कामे रखडले जावू नये साठी आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment