मनपा कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

मनपा कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार

 मनपा कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार

मनपा कायद्याचा वापर करावा : आ. संग्राम जगातप

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांनी मनपा कायद्याचा वापर करुन शहरातील प्रश्न मार्गी लावावे. कामांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याची सवय लावावी. प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपली दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. आपल्या सर्वांना बरोबर घेऊन शहराचे विकासातून रुप बदलायचे आहे. शहरात फिरत असताना प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांनी बारकाईने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. कोणत्याही विभागाचे काम आपल्या दिसले तरी उदा. पाईप लिकेज, कचरा, अतिक्रमण आदींसह कामांचा फोटो काढून त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे पाठवावा व तो प्रश्न त्वरित मार्गी लावावा. महापालिका ही आपल्या सर्वांचे एक प्रकारचे कुटुंब आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
   मनपा कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आ. संग्राम जगताप यांनी कर्मचार्‍यांचा 6 व 7 वा वेतन आयोग मंजूर करुन दिल्याबद्दल सत्कार करताना विजय बोधे, सहाय्यक उपायुक्त दिनेश सिनारे, विजय बालानी, जितेंद्र सारसर, अशोक साबळे, डॉ. नरसिंह पैठणकर, नाना गोसावी, सुधीर सूळ, बाळासाहेब विधाते, राहुल साबळे, अशोक कांबळे, बाळासाहेब पवार, संजय गाडे, अजय माने, गबाजी झिने, शाम गोडळकर, अविनाश हंस, नंदा भिंगारदिवे, बाळासाहेब व्यापारी, दिनेश सूळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here