आ.अरुण जगतापांच्या निवासस्थानी जेष्ठनेते खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

आ.अरुण जगतापांच्या निवासस्थानी जेष्ठनेते खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत

 आ.अरुण जगतापांच्या निवासस्थानी जेष्ठनेते खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार हे रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार जगताप द्वियांनी व सचिन जगताप यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केला. बर्‍याच महिन्यांनी जेष्ठनेते खा.शरद पवार हे नगरला आल्याने आ.अरुण जगताप यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. लहू कानडे, आ.आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, राहुल जगताप, शेखर घुले, जेष्ठनेते पांडुरंग आभंग, उदय शेळके, घनश्याम शेलार, नगरध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते.
जगपात कुटुंबियांच्या वतीने खा.शरद पवार यांचा आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी पार्वती जगताप, जी.प.सदस्या सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ.शशिकांत फटके, डॉ.वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप आदी उपस्थित होते.
    यावेळी खा.शरद पवार यांनी उपस्थित सर्व नेत्यांबरोबर जिल्हा बँकेच्या होणार्‍या निवडणुकी बाबत चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. माहआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून ही निवडणूक लढवावी अशी सूचना करून त्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी 27 जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे असे सांगितले. यावेळी शेखर घुले, पांडुरंग आभंग यांनी निवडणुकीच्या सध्य परिस्थीची सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here