जिल्ह्यातील ऐतिहासिक माहिती पुस्तकाचे खा. विखे व आ. जगताप यांच्या हस्ते प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

जिल्ह्यातील ऐतिहासिक माहिती पुस्तकाचे खा. विखे व आ. जगताप यांच्या हस्ते प्रकाशन

 जिल्ह्यातील ऐतिहासिक माहिती पुस्तकाचे खा. विखे व आ. जगताप यांच्या हस्ते प्रकाशन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर जल्लोष (ट्रस्ट)च्या संकल्पनेतून आणि हॉटेल द व्हिलेजच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु आणि धार्मिक स्थळांची माहिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुजयदादा विखे पाटील व आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी अ‍ॅड. धनंजय जाधव, सभागृह नेते मनोज दुलम, श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, उडान फाउंडेशनचे जितेंद्र तोरणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
   याप्रसंगी खासदार विखे पा. म्हणाले की, देशाच्या पातळीवर नगर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. शहरातील युवक शहराच्या प्रगतीसाठी उस्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. त्यांच्यात आपल्या शहराबद्दल एक आस्था आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. याच उद्देशाने नगर जल्लोष परिवाराने जे आपलं अहमदनगर हे पुस्तक काढले आहे, ते नगरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. याचबरोबर नवीन व्यावसायायिकांना सुद्धा आपला व्यवसाय वाढविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
   यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहराला धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याचे जतन नगर जल्लोष ट्रस्टने आपलं अहमदनगर या पुस्तिकेच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे काम केले आहे. यामुळे शहराच्या पर्यटनाला चालना मिळून व्यावसायिकीकरण वाढण्यास मदत होईल. शहराच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचार मांडणे गरजेचे आहे. आपली मातृभूमीचे महत्त्व वाढविण्याचे काम प्रत्येकान करावे, येत्या दोन वर्षामध्ये नगरचे रुप विकासातून बदलले दिसेल, नगर जल्लोष परिवार सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्तरोत्तर आपला नाव उंचावत आहेत, असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.
   अ‍ॅड. धनंजय जाधव म्हणाले की, नगर जल्लोष ही एक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात तळमळीने काम करणारी संस्था आहे. संस्थेचे प्रत्येक उपक्रम हे समाजासप्रेक आणि अनुकरणीय असे असतात. यांचा आदर्श घेऊन इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन नगर शहराच्या विकासात व सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे ते म्हणाले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांनी केले. नगर शहर व परिसरातील धार्मिक व ऐतिहासिक वास्तू समाजासमोर आणण्यासाठी नगर जल्लोष ट्रस्टने आपलं अहमदनगर या पुस्तिकेच्या माध्मयातून आणण्याचे काम केले आहे. ही पुस्तिका पाकिट डायरी असून प्रत्येकजण आपल्या सोबत बाळगू शकतो. आपल्या शहराने सामाजिक, शैक्षणिक आणि कलेच्या क्षेत्रात ओळख निर्माण केलेली आहे. या पुस्तिकेमध्ये ग्रामदैवत विशाल गणपती, राष्ट्रीय नेत्यांचा कक्ष, बागरोजा, हश्त-बेहश्त बाग, दमडी मस्जीद, फराह महाल, चांदबिबी महाला, मांजर सुंबा गड, खापरी नळ असलेली हत्ती बारव, निसर्ग रम्य डोंगरगण, मेहेरबाबा, ह्यूम मेमोरियल चर्च, आनंदधाम, वेदांत दत्त देवस्थान, रणगाडा संग्राहालय, स्नेहालय, ऐतिहासिक वास्तू संग्रहालय, हिवरे बाजार, स्पेस ओडीसी तारांगण, श्री अयप्पा मंदिर, शिर्डीचे साईबाबा, श्रीक्षेत्र मोहटा गड, आगडगावचे श्री काळभैरवनाथ, मिरावली पहाड, महावीर कलादालन, श्रीमंत बालाजी गणेश मंदिर आदींची फोटोसहीत माहिती या पुस्तिकेद्रवारे दिले आहे.
    सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी तर आभार योगेश ताटी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे महिला विश्वस्त सौ.पल्लवी बोगा, विद्या शिवरात्री, आरती बोगा, वर्षा सुरकुटला, कल्याणी रच्चा, सपना श्रीपत, श्रद्धा रच्चा तसेच रत्नाकर श्रीपत, अजय म्याना, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लोहार, निलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, श्रीनिवास इप्पलपेल्ली, प्रशांत विधाते, इरफान शेख, जालिंदर जगताप, विकास जाधव, विराज म्याना, अक्षय धाडगे, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, आदीनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment