राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना, अध्यक्षपदी शिरसाट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना, अध्यक्षपदी शिरसाट

 राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना, अध्यक्षपदी शिरसाट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली असून संघटनेच्या अध्यक्ष पदी दादासाहेब रामचंद्र शिरसाट ह्यांची नियुक्ती करण्यात आली.
राहुरी तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयांची  सहविचार सभा आज सकाळी अभिषेक वाचनालय, राहुरी येथे संपन्न झाली.
सार्वजनिक ग्रंथालयापुढील समस्या आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राहुरी तालुका ग्रंथालय संघाची  स्थापना आज राहुरी येथे झालेल्या सार्वजनिक ग्रंथालय प्रतिनिधींच्या  सहविचार सभेत करण्यात आली.
राहुरी तालुक्यात एकुण 37 ग्रंथालये असून एकमताने संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली.
देसवंडी येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयाचे  दादासाहेब शिरसाठ यांची अध्यक्षपदी, तर बाभुळगांव येथील श्री.कदमराव पवार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संभाजी पवार यांची प्रमुख कार्यवाह पदी, निवड करण्यात आली.
कार्यकारिणी खालील प्रमाणे ः खजिनदार- प्रा.संजय तमनर (तमनर आखाडा) शिवाजी घाडगे(श्री शिवाजीनगर)अश्विनी कुमावत(राहुरी खुर्द)प्रशांत हराळ (ब्राम्हणी) संभाजी वाळके (देवळाली प्रवरा) संजय सिनारे (चांदेगाव), रघुनाथ नालकर (कणगर)बाळासाहेब गागरे (कानडगाव)यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमिञ मुरलीधर नवाळे हे होते. या प्रसंगी सुरेश हराळ,संभाजी पवार,संजय तमनर,अनिल नवले,संजय सिनारे,रघुनाथ नालकर,मुरलीधर नवाळे,बाबुराव घाडगे,सुभाष शेजवळ,बाळासाहेब गागरे,संभाजी वाळके, दादासाहेब शिरसाठ,अभिषेक नवाळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. सहविचार सभेचे प्रास्ताविक करताना संभाजी पवार यांनी सभेचा हेतू विषद केला.सुरेश हराळ यांनी आपल्या  भाषणात लोकसहभाग कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले.सूञसंचलन प्रा.संजय तमनर यांनी केले,तर आभार सुरेश हराळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment