पारनेर-कान्हूर पठार रोडवरील सोबलेवाडी येथील रस्ता दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

पारनेर-कान्हूर पठार रोडवरील सोबलेवाडी येथील रस्ता दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

 पारनेर-कान्हूर पठार रोडवरील सोबलेवाडी येथील रस्ता दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  येथील सोबलेवाडी येथे काही दिवसापासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्याला खड्डे याचे रूप आले आहे या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होऊन काहीजण मृत्युमुखी पडले आहेत तर काहींना आपले हात पाय गमवावे लागले. असे होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे असे दिसून येत आहे या रस्त्यावरून शाळकरी मुले एसटीची सुविधा नसल्यामुळे मोटरसायकलचा वापर करतात परंतु रस्त्याला खंडे असल्याकारणाने त्यांना जीव मुठीत घेऊन वाहन चालावे लागत आहे तर काही वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा सार्वजनिक विभागाकडे निवेदन देऊनही या रस्त्याचे दुरुस्ती करण्यात सार्वजनिक विभाग  कमी पडत आहे असे दिसून आले आहे का असा प्रश्न जनतेसमोर पडत आहे . असे सोबलेवाडी ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर तहसील व पारनेर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले असून  ह्या रस्त्याचे काम आठ दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा सोबलेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर तसेच तहसीलदार मॅडम पारनेर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला आठ दिवसाचा अवधी द्या असे सांगितले असून तीन फेब्रुवारी पर्यंत आम्ही रस्ता दुरुस्त करून देऊ असे आश्वासन दिले आहे जर आठ दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलनचा इशारा दिला आहे जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.          - नवनाथ सोबले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here