स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद.

 स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद.


अहमदनगर -
स्वस्तात सोने दाखविण्याचे आमिष दाखवून लूटमार करणारा मोक्का लागलेला दीड वर्षांपासून फरार असणारा सराईत गुन्हेगार पांड्या उर्फ पांडुरंग भारम भोसले वय 26 वर्ष, रा. पंढेगाव. ता. कोपरगाव यास त्याच्या राहत्या घरी अटक करून कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की दि 7 जुलैला दिनेश दगडू पाटील, रा. सुमती वसंत आपारमेंट, पाटील लेन, नाशिक यांना आरोपी भगीरथ भोसले, हिरू भोसले रा. पढेगाव, ता. कोपरगाव यांनी व त्याचे साथीदारांनी मिळून 10,00,000/रू. किं.स एक किलो सोने स्वस्तात विकत देण्याचे आमिष दाखवून सावळगाव शिवार, ता. कोपरगाव येथे बोलावून घेवून मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याच्या अंगठ्या एकूण 10,74,000/रू. किं.चा ऐवज लुटला होता.या गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने व वेळोवेळी संघटितपणे गुन्हे करीत असल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि. कलमे लावण्यात आलेले होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी हे नजरेआड झालेले होते. गुन्हातील फरार आरोपींचा शोध घेणेकामी मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने पोनी/श्री. अनील कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्वतंत्र पथक नेमले होते.पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्ह्यातील फरार आरोपी पांड्या उर्फ पांडुरंग भोसले, रा. पंढेगाव, ता. कोपरगाव हा त्याचे घरी पंढेगाव येथे येणार आहे. पथकातील सफौ/मोहन गाजरे, पोहेकॉ/बाळासाहेब मुळीक, पोना/शंकर चौधरी, सचिन आडबल, विशाल दळवी, दीपक शिंदे, राहुल सोळुंके, रणजित जाधव, रोहित यमूल, चापोना/चंद्रकांत केसुळकर अशांनी मिळून पंढेगाव येथे जाऊन आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेऊन मिळालेल्या माहितीचे आधारे सापळा लावून आरोपी पांड्या उर्फ पांडुरंग भारम भोसले यास ताब्यात घेऊन कोपरगाव तालुका पो. स्टे. येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही कोपरगाव तालुका पो.स्टे. हे करीत आहेत.
ही कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संजय सातव सो. उपविभागीय पोलिस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment