मनपाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

मनपाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 मनपाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सफाई कर्मचार्‍यांचे कौतुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. मनपाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला आहे. मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून देशाचे संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी सर्व नगरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  
याप्रसंगी बोलताना मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळै म्हणाले की, आपल्या देशावर कोरोना संसर्ग विषाणूचे संकट आले होते. परंतु सर्वांनी एकीच्या बळावर ते परतून लावले आहे. नगर शहरात कोरोना रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असताना मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा दिली. आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व स्वच्छता निरिक्षकांनी नगर शहरातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे नगर शहर स्वच्छ दिसू लागले आहे. काही नागरिक व व्यवसायिक आजही रस्त्यावर कचरा टाकण्याचे काम करित आहे. त्यांचेवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिले.
यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती मा.सौ.लताताई शेळके, उपायुक्त डॉ.श्री.प्रदिप पठारे, श्री.संतोष लांडगे, श्री.राऊत, श्री.दिनेश सिनारे, नगररचनाकार श्री.चारठाणकर, श्री.एस.बी.तडवी, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, आरोग्याधिकारी डॉ.श्री.अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख श्री.शंकर मिसाळ, नगरसेविका मा.श्रीमती पल्लवी जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here