मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संघटनांना 1111 रोपांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संघटनांना 1111 रोपांची भेट

 मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संघटनांना 1111 रोपांची भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः राज्याचे वनमंत्री संजय राठोड व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेतून राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्टान व प्रवीण घुले मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महेश तनपुरे यांचे चिरंजीव पृथ्वीराज याच्या प्रथम वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगरपंचायत आणि सर्व सामाजिक संघटनाना एक हजार एकशे अकरा रोपांची आ रोहित पवार यांच्या हस्ते भेट देण्यात आली. या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, संभाजी पाटील, मिलिंद तनपुरे, शरद तनपुरे, राजेश्वरी तनपुरे, प्रा.तान्हाजी पाटील, अनिल तोरडमल, भाऊसाहेब रानमाळ, आशिष बोरा, शब्बीरभाई पठाण, बापूसाहेब नेटके, सुनील शेलार, आदी सह अनेक ठिकाणी जण उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की
सामाजिक हेतूने अनेक लोक श्रमदान करत स्वच्छता करत आहेत, याचा अभिमान आहे. कर्जत शहर मोठे कुटुंब आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. माझी वसुंधरा स्पर्धेत आपल्याला राज्यात पाहिले यायचे आहे तर स्वच्छता अभियानात आपल्याला देशात पहिल्या पाच मध्ये यायचे आहे. शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी सर्व लोक प्रयत्न करत आहेत. आपले शहर एक होत आहे शहराला बदल पाहिजे आहे यासाठी स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्यांनी तो करण्यासाठी प्रयत्न केला याचा मला अभिमान आहे. संत श्री गोदड महाराजाची ही पावन भूमीव आहे येथे आहे यापूर्वी काय होत होते हे पाहण्यापेक्षा यापुढे काय व्हायला पाहिजे हे सर्व पाहण्याची गरज आहे.
जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्टानच्या माध्यमातून संस्थापक महेश तनपुरे यांनी कोरोना काळात गरजूंना मोफत भोजन, मास्क, सॅनिटायझर, उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड तपासणी केंद्र, परप्रांतीयांची व्यवस्था व घरवापसीची व्यवस्था, केली आहे. आज मुलाच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी रोपे भेट दिली आहेत. तर
प्रवीण घुले म्हणाले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेतून राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्टानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. महेश तनपुरे हा या  कामामुळेच युवकांचा आयडॉल बनला आहे अशीच प्रेरणा इतरांनी घ्यावी. प्रास्ताविक गोविंद जाधव यांनी केले तर आभार सचिन घुले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तनपुरे व निलेश दिवटे यांनी केले. यावेळी अमोल भगत, धनंजय लाढाने, रामराजे जहागीरदार, प्रियेश सरोदे आदीसह अनेक श्रम प्रेमी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment