मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’च्या गौरव यादीत 25 वे मानांकन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’च्या गौरव यादीत 25 वे मानांकन

 मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’च्या गौरव यादीत 25 वे मानांकन


दुबई :
अल अदील ट्रेडिंग चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे नुकतेच टॉप इंडियन लीडर्स इन द मिडल इस्ट 2021 या यादीत 25 वे मानांकन जाहीर झाले आहे. पश्चिम आशियातील आघाडीच्या 100 भारतीय व्यावसायिक नामवंतांच्या या प्रतिष्ठित यादीत डॉ. दातार 27व्या स्थानावर होते. रीटेल क्षेत्रातील कटिबद्धतेद्वारे पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रगतीत योगदान दिल्याबद्दल हा गौरव आहे.
फोर्ब्जतर्फे ही यादी तयार केली जाताना संबंधित नामवंतांची नक्त मत्ता (नेटवर्थ), कार्यक्षेत्रातील त्यांचे महत्त्व व योगदान, गेल्या वर्षभरातील प्रगती व कामगिरी, रोजगार निर्मितीवर घडवलेला परिणाम, सामाजिक परिणाम व इतर कंपनी सामाजिक जबाबदारी उपक्रम यांचा विचार केला जातो. डॉ. दातार यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच गेल्या वर्षात सामाजिक बांधीलकीचे स्तुत्य प्रयत्न केले आहेत. कोविड 19 विषाणू साथीदरम्यान जून 2020 मध्ये दुबईत अडकून पडलेल्या व मायदेशी परत जाऊ इच्छिणार्‍या रोजगारवंचित गरजू भारतीयांना डॉ. दातार यांनी स्वखर्चाने विमानाची तिकीटे काढून दिली. या मोहिमेचा गौरवपूर्ण उल्लेख फोर्ब्ज मिडल इस्ट कडून करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, फोर्ब्ज मिडल इस्ट ने माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रतिष्ठित यादीत मानांकन दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खरंतर गेले वर्ष करोना साथीमुळे सर्वांसाठीच खडतर ठरले आणि उद्योग क्षेत्राच्या वाटचालीवरही विपरीत परिणाम झाला. माझ्या अल अदील कंपनीने हे आव्हान पेलताना सामाजिक बांधीलकीचाही विसर पडू दिला नाही. या प्रयत्नांत माझे कुटूंबीय, कर्मचारी व ग्राहक यांची मोलाची साथ मला लाभली. परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीय बांधवांना घरी सुखरुप परतता यावे यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत केली. लॉकडाऊन काळात रोजगारवंचित व निर्धन भारतीयांना खाद्यपदार्थांचे व औषधांचे हजारो संच मोफत पुरवणे, गरजूंच्या कोविड आरोग्य तपासणीचा व परतीच्या विमान तिकीटाचा खर्च उचलणे या मार्गांनी आम्ही 5000 हून अधिक भारतीयांना मायदेशी पोचवले. असहाय्य स्थितीत अनवधानाने स्थानिक कायद्याचे पालन न झाल्याने तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही स्वयंसक्रियतेने पाठपुरावा केला आणि त्याला यश आले.
ते पुढे म्हणाले, कोविड साथीप्रमाणेच तर अन्य कारणांनीही संकटात सापडलेल्यांना आमच्या समूहाने मदत केली. कोझिकोड विमानतळावर ऑगस्ट 2020 मध्ये घडलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमान दुर्घटनेत वैमानिक श्री. साठे व सहवैमानिक अखिलेश कुमार यांच्यासह 20जण मृत्यूमुखी पडले. या सर्वांच्या कुटुंबियांना आम्ही स्वनिधीतून 22 लाख रुपयांची मदत केली. हे करत असताना आम्ही व्यावसायिक बांधीलकीचाही विसर पडू दिला नाही. पूर्ण वर्षभरात आम्ही आखाती देशांतील आमच्या ग्राहकांना कोणत्याही खाद्यपदार्थांची कमतरता भासू दिली नाही. फोर्ब्जचे मानांकन ही एकप्रकारे प्रोत्साहनाची पाठीवरील थाप असून कामाचा हुरूप वाढवणारी आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here