- Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

 जरे हत्याकांडातील बोठेच्या जामिनाची सुनवणी होणार या दिवशी



अहमदनगर-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड बाळ बोठेला दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पाच आरोपींना हत्येनंतर दोन दिवसांत पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र हत्येचा मास्टरमाईंड बाळ बोठे अद्याप फरार आहे. बोठेचा अटकपूर्वचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी होती. मात्र खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी सोमवार दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. 

 बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत. तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे मोठे आव्हान  पोलिसांपुढे आहे.



No comments:

Post a Comment