दीर्घ सुटीनंतर आजपासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरु... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

दीर्घ सुटीनंतर आजपासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरु...

 दीर्घ सुटीनंतर आजपासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरु...



अहमदनगर ः
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज शहरातील इयत्ता 5 वी ते 8 वी चे वर्ग महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व अटी व शर्तीचे पालन करत सुरू करण्यात आले असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे तापमान घेऊन, सॅनिटायझर लावून तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. एका बेंचवर एक विद्यार्थी या नियमाचे शहरातील शाळांमध्ये पालन करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच पालकांचे संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश देण्यात आला, परंतु पहिल्या दिवशी शहरातील शाळेमध्ये अल्प प्रतिसाद दिसून आला. असून दहा महिन्यांच्या मोठ्या सुट्टीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण होते.

No comments:

Post a Comment