ज्वारी पिकावरील रोगावर उपाययोजना करावी : सपकाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

ज्वारी पिकावरील रोगावर उपाययोजना करावी : सपकाळ

 ज्वारी पिकावरील रोगावर उपाययोजना करावी : सपकाळ

ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचे प्रमाण वाढले होते मात्र मागील तीन चार दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढले असल्याने अळीचे प्रमाण नैसर्गिक पद्धतीने कमी होत चालले असून आमचे सर्व कृषी सहाय्यक या रोगा बाबत उपाय योजना व जनजागृती करत आहेत. असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यात उगवून आलेल्या ज्वारी पिकावर लष्करी अळीचा पादुर्भाव फार मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान मोठया प्रमाणात होत आहे.त्यामुळे या रोगावर उपाययोजना करून शेतकर्‍यांना सहकार्य करावे असे निवेदन शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रघुनाथ सपकाळ, ड.रमेश जठार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उजागरे यांनी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पंचायत समिती कृषी अधिकारी यांना दिले.
      तालुक्यात मोठ्या पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी रब्बी ज्वारी पेरणी मोठ्या प्रमाणात केली असून काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरणाने उगवून आलेल्या ज्वारी पिकावर मोठया प्रमाणात लष्करी अळीचा पादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या रोगामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो त्यामुळे या अळीचा अटकाव करून रोगावर उपाययोजना करावी. अशी मागणी शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रघुनाथ सपकाळ, ड.रमेश जठार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उजागरे यांनी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.

No comments:

Post a Comment