भैय्यासाहेब आंबेडकरांचे कार्य दिपस्तंभासारखे : प्रशांत चव्हाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

भैय्यासाहेब आंबेडकरांचे कार्य दिपस्तंभासारखे : प्रशांत चव्हाण

 भैय्यासाहेब आंबेडकरांचे कार्य दिपस्तंभासारखे : प्रशांत चव्हाण


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः भारतीय बौद्ध महासभभेचे द्वितीय अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब यशंवंत आंबेडकरांचे कार्य  दिपस्तंभा सारखे आहे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रशांत चव्हाण यांनी भैय्यासाहेब आंबेडकरांच्या 108 व्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धोंडीबा घोडके यांनी भुषविले, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष भगवंत गावकवाड, सरचिटणीस राजेंद्र साळवे उपस्थित होते .
  भैय्यासाहेबांनी कधीही कोणत्याही कामासाठी बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. यशवंतरावांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ या मुखपत्रांचे व्यवस्थापन पाहत होते. भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ होय. बाबासाहेबांनंतर भारतीय बौध्द महासभा ,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया समता सैनिक दल इ.संस्थेवर अध्यक्ष म्हणून दिपस्तंभासारखे काम केल्याचे चव्हाण यांनी सांगीतले. या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य व उत्तकृष्ट असे कार्य करणार्‍या श्रीगोंदा सिटिझनचे संपादक अमिनभाई शेख, नगर सह्याद्रीचे राजेंद्र राऊंत, नगरी दवंडीचे योगेश चंदन या पत्रकारांचा सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला .गौतम चाबुकस्वार , राहुल झेंडे, संजय ओहोळ, आनंद घोडके , रेवण घोडके , रमेश घोडके उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश ओहोळ सर प्रास्ताविक पंडीत कांबळे तर आभार गोरख घोडके यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here