बनावट सोनेतारणप्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

बनावट सोनेतारणप्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल

 बनावट सोनेतारणप्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव ( ता. राहुरी) शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी 21 जणांवर 34 लाख 45 हजार 500 रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला . गोल्ड व्हॅल्युअरला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दि 26 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत चे आदेश दिले आहे .
     राहुरी न्यायालयाने शनिवार (ता. 26) पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला . दरम्यान आज दुपारी दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना आज ( सोमवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे .
गोल्ड व्हॅल्युअर अरविंद विनायक नागरे (रा . टाकळीमिया ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . संदीप बाळासाहेब अनाप , दिगंबर धोंडीबा जाधव , राजेंद्र भाऊसाहेब थोरात, भास्कर भाऊसाहेब अंत्रे, ज्ञानदेव पंढरीनाथ शिंदे, दत्तात्रेय तुकाराम शेळके (सर्वजण रा. सोनगाव), शिवाजी लक्ष्मण अनाप, प्रेमकिरण संपतकुमार डुकरे, संजय रखमाजी बेल्हेकर, अविनाश आबासाहेब नालकर , अक्षय तुकाराम गडगे , दत्तात्रेय विठ्ठल सिनारे , सचिन तुकाराम निधाने (सर्वजण रा . सात्रळ) , गणेश कैलास वांदे कोल्हार बु .) , राजेंद्र शिवाजी हारदे (रा . तिळापूर) , मुनीफ अब्दुल शेख रा . पाथरे बु॥) , संदीप हरिभाऊ सजन (रा. अनापवाडी) , नवनाथ गोपीनाथ पठारे (रा . रामपूर) , शिवाजी संपत संसारे (रा . निभेरे) , दत्तात्रेय विठ्ठल वाणी (रा . झरेकाठी) अशी आरोपींची नावे आहेत . पैकी दहा आरोपींना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले आहे . इतर दहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव ( ता . राहुरी ) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने सत्यता पडताळणीत बनावट आढळले आहे . 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली . बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .
    सोनगावचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या टप्प्यात 20 कर्जदारांसह सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी ( सराफ ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . त्यामुळे , सोनगाव सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे . पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे पुढील तपास करीत आहेत .

No comments:

Post a Comment