सुरेल गीतगायनाने सुपेकर मंत्रमुग्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

सुरेल गीतगायनाने सुपेकर मंत्रमुग्ध

 सुरेल गीतगायनाने सुपेकर मंत्रमुग्ध


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः आम्ही वृक्षवल्ली समुहाने पारनेर तालुक्यातील सुपा येथे वृक्षवल्ली उद्यानात शुक्रवारी सुरेल गीत वाद्यनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. लहान मुलांना संगीताची आवड निर्णय व्हावी व जेष्ठाना सुरेल विरगुंळा मिळावा हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. . यावेळी तालपरिक्रमा फेम कु .आकाश निमसाखरे यांनी तबला वाद्य वाजवले तर एकनाथ काळे यांनी त्यांना हार्मोनियमवर साथ संगत केली यावेळी निखिल शिर्के व वेंदात गायकवाड यांनी ही तबला वाद्यावर विविध प्रकार सादर केले .
    गायक एकनाथ काळे यांनी राग  यमन गावून कार्यक्रमाची सुरवात केली तर एकादशीच्या मुहर्तावर बोचर्या थंडीत राग  मालकंस मध्ये गायलेला  राजा पंढरीचा  या भक्ती गीताने उपस्थित मनाने पंढरीला गेले .तर काळेनी गायलेल्या गौवळ लावनीने तर वातावरण गरम करुन टाकले ,श्रोत्याच्या आगृहा खातर पाहिले न मी तुला  या भावगीताने वेगळीच उंची घेतली मोठ्या संख्येने आसलेल्या बच्चे कंपनीसाठी श्री काळे यांनी अग्गो बाई ढग्गो बाई हे बालगीत गायल्याने बाल रसीक आनंदाने झुम उठले रात्र चढत होती तशी माझे माहेर पंढरी सुरबद्ध होत होती ,तर  होशवालो  या गझलने तर रात्रीत पहाट झाल्याचा भास होत होता.. शेवटी भैरवीच्या  तालावरील मिले सुर मेरा तुम्हारा या समुह गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
    सुमारे तीन तासापेक्षा जास्त वेळ एकनाथ काळे गळ्याने गात होते .तर तबलावादक आकाश निमसाखरे हे तबल्याने गावून त्यांना साथ देत होते ,ऐका.पेक्षा एक सरस वेगवेगळ्या भावगीते, भक्ती गीते,गौवळनी,गझल, लावणी यांच्या उबेने बोचरी थंडी कुठल्या कुठे गेली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here