घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना लाभ द्या अन्यथा तीव्र आंदोलन.: नागपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना लाभ द्या अन्यथा तीव्र आंदोलन.: नागपुरे

 घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना लाभ द्या अन्यथा तीव्र आंदोलन.: नागपुरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः नेवासा नगरपंचायत येथील प्रधानमंत्री आवास योजना साठी नेवासा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी प्रधानमंत्री घरकुल योजना साठी नगरपंचायत नेवासा येथे अर्ज केले होते त्यानुसार नेवासा नगरपंचायत राज्यातील नागरिकांना घरकुल मिळाले परंतु घरकुलाचे अनेक दिवस होऊनही पैसे जमा झाले नाहीत नागरिकांनी नगरपंचायत कडून दिलेल्या नियम वाटेल नुसार कर्ज काढून व बांधकाम साहित्य उदार घेऊन बांधकाम पूर्ण केली परंतु आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे तरीदेखील लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते वेळेमध्ये मिळत नसल्याने
     लाभार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे जेमतेम परिस्थितीला असलेले गोरगरीब नागरिक यांना घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने काहीं घरकुलांचे काम अपूर्ण पडले आहेत त्याचप्रमाणे नेवासा नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेत राहणार्‍या गोरगरीब जनतेला अजून देखील घरकुलाचा लाभ मिळाला नाही या सर्व गोष्टी वर लक्ष वेधण्यासाठी नेवासा नगरपंचायत भाजप गटनेते सचिन नागपुरे त्याचप्रमाणे नगरसेवक रणजित सोनवणे त्याचप्रमाणे नगरसेविका डॉक्टर निर्मला सांगळे यांनी निवेदनाद्वारे अधिकार्‍यांना मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment