ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधीनिमित्त दीपोत्सव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधीनिमित्त दीपोत्सव

 ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधीनिमित्त दीपोत्सव

श्रीक्षेत्र देवगडच्या भास्करगिरी महाराजांची उपस्थिती

नगरी दवंडी/ज्ञानेश सिन्नरकर

नेवासा ः संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये  रविवारी दि.13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 यावेळेत दीपोत्सव करण्यात आला.या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते. ज्ञानासह अंतकरणातील ज्योत ही मनामनात पेटवा,संत विचार चंद्रसूर्य असेपर्यंत राहील असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
    रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दीपोत्सवाप्रसंगी श्री क्षेत्र देवगड येथील महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या पैस खांबाचे विधिवत पूजन करण्यात आले.त्यानंतर गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबासमोर पहिला दीप लावण्यात येऊन संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ॐ आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृती मध्ये ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात,नगराध्यक्ष सतीश पिंपळे,विश्वस्त पांडुरंग अभंग, रामभाऊ जगताप,कृष्णा महाराज पिसोटे,नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के,डॉ.करणसिंह घुले,डॉ.वेणूनाथ महाराज वेताळ,शिवा राजगिरे,जालिंदर गवळी यांच्या हस्ते दीप लावण्यात आला.

No comments:

Post a Comment