रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी चा पदग्रहण समारंभ संपन्न
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर रो.हरिष मोटवाणी व असिस्टंट गव्हर्नर रो.मनीष बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे प्रेसिडेंट रो.प्रा.विशाल मेहेत्रे व सेक्रेटरी रो.घनश्याम नाळे यांचा पदग्रहण समारंभ अभय सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात सम्पन्न झाला. यावेळी माजी प्रेसिडेंट रो.नितीन तोरडमल यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तर रो.प्रा.विशाल मेहेत्रे यांनी जुलै पासून आजपर्यंत कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. याशिवाय कर्जत शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात सर्व सामाजिक संघटनांमध्ये रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा मोठा सहभाग असल्याचे म्हटले. यावेळी कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव व तहसीलदार नानासाहेब आगळे, यांनी मनोगते व्यक्त करताना कर्जत व येथील समाजसेवी व्यक्ती व संघटनाचे विशेष कौतुक केले. प्रमुख पाहुणे असिस्टंट गव्हर्नर रो.मनीष बोरा यांनी डिस्ट्रिक गव्हर्नर यांचा परिचय करून दिला. डिस्ट्रिक गव्हर्नर हरिष मोटवाणी यांनी रोटरीच्या कार्याचा परिचय करून दिला,रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या कार्याचे विशेष कौतुक केले, कर्जत सारख्या ग्रामीण भागात काम करताना समाज हिताच्या विषयात आपण सर्व जण अत्यंत अग्रभागी असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या सर्व बोर्ड ऑफ डायरेक्ट यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रो.नितीन देशमुख, रो. राजेंद्र सुपेकर, रो.ड.नवनाथ कदम, रो.रामदास काळदाते, रो.नारायण तनपुरे, रो.अभय बोरा, रो.राजेंद्र जगताप, रो. सचिन धांडे, रो. सचिन गोरे, रो. श्रीराम गायकवाड, रो.संतोष सुरवसे, रो.डॉ. विजय चव्हाण, रो.संदीप गदादे, रो.दयानंद पाटील, यांचा बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये समावेश करण्यात आला.तर राहुल खराडे, उत्तम मोहोळकर, ओंकार तोटे, अक्षय राऊत, नामदेव गायकवाड, सुरेश वाकचौरे, गोविंद जाधव, अविनाश पुराणे, रविंद्र राऊत, डॉ. अद्वैत विलास काकडे या नुतन रोटरी सदस्यांना रोटरी पिन लावून त्याचे रोटरीत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, वन्यजीव अधिकारी केदार, सर्व पत्रकार, कर्जत शहरातील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी रोटरी सदस्य सहकुटुंब उपस्थित होते. आभार सेक्रेटरी घनश्याम नाळे यांनी आभार मानले तर सुत्रसंचलन रो.चंद्रकांत राऊत यांनी केले.
No comments:
Post a Comment