रक्तदान शिबिरात काँग्रेसच्या 212 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

रक्तदान शिबिरात काँग्रेसच्या 212 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

 रक्तदान शिबिरात काँग्रेसच्या 212 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरदचंद्र पवार साहेब आणि युवक काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष व जामखेड हमाल पंचायत चे अध्यक्ष राहुल उगले यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 212 कार्यकर्त्यांनी  या शिबिरात रक्तदान केले.विशेष म्हणजे या शिबिरात महिला आणि मुलींनी देखील रक्तदान केले.
कोरोणा काळात राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे याचं अनुषंगाने राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन काँग्रेस च्यां पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते.याच अनुषंगाने काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी  गांधी, महाविकस आघाडी चे शिल्पकार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस ता.अध्यक्ष शिवराजे घुमरे,भगिनाथ उगले,बळिराम पवार,विक्रांत अब्दुले यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी काँग्रेस चे ता.अध्यक्ष शहाजी राजेभोसले, रा.काँ. चे राजेंद्र कोठारी, मधुकर रालेभात,रा. काँ. ता.अध्यक्ष दत्तात्रय वारे,सभापती सूर्यकांत मोरे,निखिल  घायतडक,सामजिक कार्यकर्ते निलेश गायवल,  जिल्हा सचिव सुनील शिंदे, कर्जत युवक चे अमोल भगत,राम जहागीरदार,सेवा दलाचे राजु पाचारे, ता.अध्यक्ष फिरोज पठाण,कुंडल रालेभात, विकास रलेभात, पवन रालेभात, लक्ष्मण ढेपे सर,अशोक निमोंनकार,रोहित खरात,चेतन फुंदे,प्रीतम ढगे,अनिकेत जाधव आदी सह अनेक मान्यवरांनी भेट दिली.एकूण 212 जणांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे महिलांनी आणि युवती नी पण रक्तदान करण्यात पुढे होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here