शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त निलेश गायवळ यांच्याकडून आरोळे हॉस्पिटलला 3.5 लाखाच्या औषधांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त निलेश गायवळ यांच्याकडून आरोळे हॉस्पिटलला 3.5 लाखाच्या औषधांची मदत

 माजी कृषिमंत्री शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 

सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्याकडून आरोळे हॉस्पिटलला 3.5 लाखाच्या औषधांची मदत

नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड तालुक्यातील आरोळे हॉस्पिटल हे खर्‍या अर्थाने तालुक्यातील व तालुक्याबाहेरील जनतेसाठी  देवदूत ठरत आहे या हॉस्पिटल मधून आज पर्यंत उपचार घेऊन 2400 पेक्ष्या ज्यास्त रुग्ण घरी गेले आहेत. डॉ रविदादा आरोळे व डॉ शोभाताई आरोळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा बास्केटबॉल असो चे सचिव मा.प्रा सचिन सर गायवळ याच्याकडून देशाचे नेते जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोळे हॉस्पिटलमध्ये मध्ये आज 3.5लाख रुपयांचे औषधें व गोळ्या वाटप करण्यात आले.या वेळी बोलताना प्रा, सचिन गायवळ म्हणाले की ग्रामीन भागात डॉ, रवी दादा आरोळे व त्यांच्या भगिनी शोभाताई आरोळे यांनी जामखेड तालुक्यातील ज्या लोकांना कोरोना झाला आहे अशा लोकांची सेवा मोफत करून महाराष्ट्र राज्यात जामखेड कोरोना प्याटर्न म्हणून डॉ, आरोळे नावाचा निर्माण झाला असून आम्ही गायवळ बंधूनी या अगोदर लॉकडाऊन च्या काळात सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर मशीन,पिण्याचा पाणीपुरवठा, धान्य वाटप इ, सामाजिक कामे त्यांनी केलीं आहेत त्यांनी  दिलेल्या अनेक मदतीने तालुक्यातुन गायवळ बंधूंचे कौतुक होत आहे,यावेळी  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री.दत्ताभाऊ वारे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, सभापती सूर्यकांत नाना मोरे ,स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष  श्री. मंगेश दादा आजबे,  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष श्री. पांडूराजे भोसले,  शिवसेना तालुका अध्यक्ष श्री.संजय काका काशीद ,प्रहार तालुकाध्यक्ष  श्री जयसिंग उगले,माजी सभापती सुभाष आव्हाड सर, नगरसेवक मा महेश दादा निमोनकर,प्रा ढेपे सर, डव्होकेट हर्षल डोके सर,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व मा किशोर गायवळ,पत्रकार दत्तराज पवार,कल्याण सुरवसे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख मा काकासाहेब कोल्हे,युवक अध्क्ष मा.राहुल पवार, मा भोसले सर, कांतीलाल वाळुंजकर,गणेश म्हस्के, अमोल गिरमे,विजय धुमाळ सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here