केडगावला पूर्णवेळ तलाठी द्या : - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

केडगावला पूर्णवेळ तलाठी द्या :

 केडगावला पूर्णवेळ तलाठी द्या : सभापती मनोज कोतकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी



नगरी दवंडी

अहमदनगर : केडगाव हे नगर शहराचे उपनगर असून याचा  विस्तार मोठा आहे. या भागात रहिवास क्षेत्र मोठे आहे. येथील तलाठी पद अनेक दिवसांपासून रिक्त असून येथे पूर्णवेळ तलाठी नियुक्त करण्यात यावेत अशी मागणी महानगरपालिका स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विविध प्रकारचे दाखले, उतारे इ कामकाजाचा मोठा व्याप केडगाव तलाठी कार्यालयात असतो. मात्र पुर्णवेळ तलाठी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात  गैरसोय होत आहे. उत्पन्नाचे दाखले, विशेष सहाय्य योजनांसाठी आवश्यक असलेले दाखले इ. मिळवण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत, तरी केडगावला पूर्णवेळ तलाठी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी सभापती कोतकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment